बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल lyrics
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा
विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरे । परती
माघार घेत नाहीं ॥२॥
बंधनापासूनि उकलल्या गांठी । देतां आली
मिठी सावकाशें ॥३॥
तुका ह्मणे देह भरिला विठ्ठलें।
कामक्रोधे केलें घर रीतें ॥४॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा