पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा lyrics

पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा lyrics:



पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा करी अंगसंगा भक्ताचिया ॥१॥

भक्त कैवारिया होसी नारायणा बोलतां वचन काय लाज ॥२॥

मागें बहुतांचें फेडियलें ऋण आम्हा साठी कोण आली धाड ॥३॥

वारंवार तुज लाज नाहीं देवा बोलरे केशवा ह्मणे नामा ॥४॥

टिप्पण्या