भेटीलागी जीवा लागलीसे आस lyrics
भेटीलागी जीवा लागलीसे आस । पाहे रात्री दिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥२॥
दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली पाहतसे वाटुली पंढरीची ॥३॥
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥४॥
तुका ह्मणे मज लागलीसे भूक धावुनि श्रीमुख दावी देवा ॥५॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा