धरिला पंढरीचा चोर lyrics:
धरिला पंढरीचा चोर । प्रेमें बांधुनियां दोर ॥१॥
हृदयी बंदिवान केला । आंत विठ्ठल कोंडला ॥२॥
शब्दें केली जडाजडी । पायीं विठ्ठलाचे बेडी ॥३॥
सोहं शब्द नाद केला । विठ्ठल काकुळती आला ॥४॥
जनी ह्मणे बा विठ्ठला । जीवें सोडी न मी तुजला ॥५॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा