चला पंढरीसी जाऊं lyrics:
चला पंढरीसी जाऊं ।
रखमादेवीवरा पाहूं ॥१॥
डोळे निवतील कान । मना तेथे
समाधान ॥२॥
संता महंता होतील भेटी । आनंदे
नाचों वाळवंटी ॥३॥
तें तीर्थांचे माहेर । सर्व
सुखाचें भांडार ॥४॥
जन्म नाही रे आणीक । तुका
ह्मणे माझी भाक ॥५॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा