पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती lyrics
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती। रत्नकीळ फांकती प्रभा।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले। न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु। येणे मज लावियला वेधु।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी। आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देविण संवादु दुजेवीण अनुवादु । हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
पाया पडूं गेलें तंव पाऊलचि न दिसे। उभाचि स्वयंभु असे।
समोर की पाठिमोरा न कळे । ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा। म्हणवूनी स्फुरताती बाहो।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली। आसावला जीव राहो ॥५॥
बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला।
दृष्टीचा डोळां पाहों मी गेलीये । तंव भीतरी पालटु झाला ॥६॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा